आरक्षणाचा फेक नरेटिव्ह चालणार नाही, मराठा अंगावर घालता; पंकजा मुंडे शरद पवारांवर भडकल्या
Pankaja Munde Attack on Sharad Pawar : आता आरक्षणाच्या बाबतीतील फेक नेरेटीव्ह चालणार नाही, आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय, मग तुमची भूमिका काय, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सवाल केला आहे. पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षावर टीका केली.
पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षाला जोरदार फटका बसला आहे. विधानसभेत तो फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपनेच दिले. परंतु तरीही मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेला आपल्याला नाकारलं, कारण विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवला, असा दावा भाजप नेत्याकडून केला जात आहे. त्यानंतर आता प्रथमच पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रश्न विचारण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

आता फेक नरेटिव्ह चालणार नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा. तुमची भूमिका काय, असा प्रश्न त्यांनाही विचारा. नाहीतर बाप दाखव अन्यथा श्राद्ध कर, हा सूर्य हा जयद्रथ. खोटा प्रचार करणाऱ्यांना उघड पाडलेच गेले पाहिजे, असेही पंकजा म्हणाल्या.
ओबीसी, मराठा आमच्या अंगावर घालताय
पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजप कार्यकर्त्यांनी आता शांत बसून चालणार नाही. आपल्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला विचारा, तुमचं म्हणणं आहे का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय, आमच्याच अंगावर ओबीसी समाज घालताय, मराठा समाज आमच्या अंगावर घालताय, आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय, जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि येथील राजकारण उध्वस्त करायला लागलो आहे, असे म्हणत मुंडे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला.
तुम्हीच पक्षाचे खरे सैनिक आहात
लोकसभेला आपलं जे नुकसान झालंय ते भरुन काढायचं आहे. म्हणूनच, आपल्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. आता, पक्षासाठी आपण सर्वांनी जोमाने काम करायला हवं, सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं, तुम्ही सैनिक आहात. भाजप कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद विसरुन पक्षासाठी काम करावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी








Click it and Unblock the Notifications