पंकजाताईंना विधानपरिषद ; फडणवीसांनी मानले केंद्रीय समितीचे आभार
पुणे : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टीळेकर, अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हिंदू समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाची लोकसभेमध्ये माफी मागावी...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2024
(माध्यमांशी संवाद | 📍पुणे | 1-7-2024)#Maharashtra #Pune #RahulGandhi #LokSabha pic.twitter.com/XGx2tvJqfc
दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी लोकसभेत हिंदू बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले, हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे,असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications