माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या 5 जणांच्या चरणी माझं यश अर्पण, पंकजा मुंडे भावूक
मुंबई : विधान परिषदेसाठी भाजपाच्या केंद्रीय समितीने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात विशेष पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टीळेकर, अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.आज पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभरदेखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. मग मी अर्ज दाखल करेन."मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ,विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार या सर्वच सदस्यांचे आभार मानते, ज्यांनी माझं नाव सुचवलं. लोकांना प्रतिक्षा करावी लागली. मला हवंय ते करण्यापेक्षा लोकांना हवंय ते राजकारणात करायचं असतं. आता लोकांना हवंय ते झालंय, मी सर्वांचे आभार मानते.
माझं यश या पाच जणांना अर्पण
बीड लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाच कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. मी त्यांना माझं हे यश मी समर्पित करते", असंही त्या म्हणाल्या.
माझ्या प्रत्येक संघर्षात मुंडे साहेब आहेत
माझ्या प्रत्येक संघर्षात मुंडे आहेतच.या सर्वांच्या घोषणत आहेत, या सर्वांच्या कष्टात आहेत, माझ्या परिश्रमात आहेत.आमच्या सगळ्याच्या संस्कारात आहेत.ते तर सदैव राहतील.आजच्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी केलं त्याला आणि ज्यांनी स्वत:चा प्राण ही दिला त्या सगळ्यांना हे समर्पित करते.
देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्रीय समितीचे आभार
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications