एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत काय वाटतंय? पंकजा मुंडे म्हणाल्या- मी XYZ माणसांबद्दल बोलत नाही

Pankja Munde : मी भूमिकेचे राजकारण करते. कोण काय बोलले त्यावर मला बोलयाचे नाही. XYZ माणसांबद्दल मी बोलत नाही, असे परखड मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडले. एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरुन सुरू असलेल्या राजकारणावर माध्यमांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न केला असता त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे खडसेंच्या विधानावर न बोलण्याचा सावध पवित्रा घेतला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंकजा मुंडे यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन करण्यात झाले. त्या ग्रामविकास मंत्री असताना राहाता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली होती. इमारतीच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावर त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर लक्ष वेधले.

Pankja Munde

XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही

माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसे याच्या पक्षप्रवेशावरुन सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या की, ते काय म्हणाले यावर मी काय बोलणार? अमूक कोणी म्हटले म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया करणे योग्य नाही अन् मी ते कधीही करत देखील नाही. मी भूमिकेवर राजकारण करते. काय काम झालं पाहिजे हे मी बघते. XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं.

लाडकी बहीण योजना लोकांना खूप आवडलीय

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना ही खूप मोठी योजना आहे. लोकांना देखील ही योजना खूप आवडली आहे. आम्ही सगळे जरी कामाला लागलो तरी सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे आमच्यात कुठंही चढाओढ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाईल

महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन पक्ष वेग वेगळ्या पद्धतीचे राजकारण करत असतात. विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील, अशी अपेक्षा नसते. तोंडावर निवडणुका आल्या आहेत. प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

खडसे-महाजन-फडणवीस वाद काय?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच मोठा गौप्यस्फोट केला. भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे फडणवीस व महाजन हे जे. पी. नड्डा यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत का, असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+