Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उमेदवारी न मिळालेले पालघरचे आमदार डिप्रेशनमध्ये अन् नाॅट रिचेबल! पत्नीची प्रतिक्रीया आली समोर, वाचा

Palghar MLA Srinivasa Vanaga N0t Reachable : पालघरचे आमदार श्रीनिवास वानगा हे कालपासून बेपत्ता आहेत.काल संध्याकाळी अचानक घरातून ते निघून गेले होते पण अचानक ते आज घरी परतले नाही, त्यांचे दोन्हीही फोनही नाॅट रिचेबल आहेत. यासंदर्भात त्यांच्या पत्नींची प्रतिक्रीयाचा समोर आली आहे.

तिकीट न मिळाल्याने वनगा यांनी आपण नाराज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कालपासून ते अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोधही सुरु आहे.

Palghar MLA Srinivasa Vanaga Not Reachable who did not get nomination

मी संपर्कात पण काॅल लागत नाही

एका माध्यमाशी बोलताना वनगा यांच्या सुमन पत्नी म्हणाल्या, ते काही सांगून गेले नाहीत. ते कुठे गेले हे माहीत नाही. ते कुणासोबत गेले माहीत नाही त्यांची गाडीही घरीच आहे ते चालत निघून गेले. काही नेत्यांचे आम्हाला फोन आले आहे. आम्हाला वनगा यांच्याशी बोलायचे असे ते म्हणत होते पण मी त्यांना सांगितले की, माझाच काॅल लागत नाही.

पती सुखरुप घरी यावे

सुमन वनगा म्हणाल्या, लोक त्यांना उमेदवारी द्यायची नाही असे म्हणाले म्हणून माझ्या पतीला उमेदवारी दिली गेली नाही असे आम्हाला सांगण्यात आले आहे. काही नेते आम्हाला आश्वासन देत होते.
माझे पती सुखरुप असावे आणि व्यवस्थित घरी यावे असेही वनगा म्हणाले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांना तिकीट न मिळाल्याने ते आधी ढसाढसा रडले होते आणि आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर गेल्या 13 तासांपासून बेपत्ता झाले. त्याचा फोनही बंद आहे. आता पालघर पोलीस वनगा यांचा शोध घेत आहेत.

पालघरचे तिकीट न मिळाल्याने रडले आमदार

शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी या जागेवरून दुसऱ्याच नावाची घोषणा झाल्यावर वनगा दु:खी झाले. तिकीट कापल्यावर तो रडायला लागला आणि वाईट वाटलं. शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी दिली तेव्हा श्रीनिवास यांनी शिंदे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+