Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेने पाकिस्तानला 'टॉयलेट पेपर'सारखे वापरले!;संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफांची संसदेत खळबळजनक कबुली

Pakistan Defense Minister Khawaja Asif Slams US : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी संसदेत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले. "अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी आमचा वापर केला आणि उद्देश पूर्ण झाल्यावर एखाद्या टॉयलेट पेपरसारखे फेकून दिले," अशा अत्यंत जहाल शब्दांत त्यांनी पाकिस्तानच्या आजवरच्या भूमिकेवर टीका केली. गेल्या काही दशकांपासून अमेरिकेच्या तालावर नाचणाऱ्या पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला असल्याची कबुलीच त्यांनी या निमित्ताने दिली आहे.

Pakistan Defense Minister Khawaja Asif Slams US

हुकूमशहांच्या चुकांची देशाला मोठी किंमत

ख्वाजा आसिफ यांनी थेट लष्करी हुकूमशहांच्या निर्णयांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ या दोन लष्करी हुकूमशहांनी जागतिक महासत्तांचा विशेषतः अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटले. अफगाणिस्तानातील युद्धांमध्ये आम्ही इस्लाम आणि धर्माच्या नावाखाली सहभाग घेतला, परंतु तो केवळ सत्तेचा स्वार्थ होता. आज पाकिस्तानात जो दहशतवाद फोफावला आहे, तो या हुकूमशहांच्या चुकांचेच फळ आहे.

9/11 नंतरची भागीदारी अन् पाकचे नुकसान

1999 नंतर अमेरिकेसोबत केलेल्या धोरणात्मक भागीदारीवर आसिफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान अजूनही मोठी आर्थिक आणि सामाजिक किंमत मोजत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

"आम्हाला आमचा इतिहास आणि चुका मान्य नाहीत. युद्धाचे समर्थन करण्यासाठी आमच्या शिक्षण व्यवस्थेत जाणीवपूर्वक बदल केले गेले, जे आजही कायम आहेत. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे." - ख्वाजा आसिफ, संरक्षण मंत्री (पाकिस्तान)

बिल क्लिंटनची भेट अन् पाकचा अपमान!

आसिफ यांनी 2000 मधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भेटीचा उल्लेख करत पाकिस्तानला आरसा दाखवला. भारत दौऱ्यावर आलेले क्लिंटन थोड्या वेळासाठी पाकिस्तानला आले होते. त्यावेळी देशात लोकशाही नव्हती आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून लावले होते. क्लिंटन यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मुशर्रफ यांच्यावर अणुप्रसार आणि दहशतवादावरून दबाव आणला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ऐतिहासिक संदर्भावर एक नजर

१९७९ सोव्हिएत युनियन हस्तक्षेप : अमेरिकेने या घटनेला थेट हल्ला ठरवून आपले कथानक तयार केले आणि पाकिस्तानचा वापर केला.

१९९९ चे लष्करी बंड : १२ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली, ज्यामुळे २००२ पर्यंत पाकिस्तानात कोणतेही लोकशाही सरकार नव्हते.

आजची स्थिती : आसिफ यांच्या मते, पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही आणि देश आजही अमेरिका, रशिया व ब्रिटनवर अवलंबून आहे.

आत्मपरीक्षणाची वेळ

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिलेली ही कबुली देशाच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणणारी आहे. ज्या दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तानने अमेरिकेची मदत मिळवली, तोच दहशतवाद आता त्यांच्या अंगलट आला आहे, हेच आसिफ यांच्या विधानांतून स्पष्ट होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+