नालासोपारा येथे पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन करणा-या तिघांना पोलिसांकडून अटक
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर लावलेल्या पाकिस्तानी झेंड्यांना काही मुस्लिम तरुणांनी काढून टाकले, ज्यावरून वाद निर्माण झाला. या घटनेत काही तरुणांनी पाकिस्तानच्या समर्थनात बोलल्याचा दावा केला जात आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नाला सोपारा पश्चिमेकडील ऑरेंज हाइट्सजवळ, स्थानिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा ठेवून तो जाळला. यावेळी 'पाकिस्तान मुर्दावाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी काही तरुणांनी हा आमच्या धर्माचा झेंडा आहे, तुम्ही वापरू शकत नाहीत,असे म्हणत या तरुणांनी वाद घातला घातला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की या तरुणांनी पाकिस्तान समर्थक गोष्टी बोलल्या, ज्यामुळे वातावरण तापले. आंदोलक आणि तरुणांमध्ये झटापट झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून नाला सोपारा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप केला आणि चारही तरुणांना ताब्यात घेतले.
उस्मान गणी, तौशिद आझाद शेख आणि अदनान अफसर शेख अशी अटक करण्यात आलेल्या मुस्लिम तरुणांची नाव आहेत. दरम्यान 26 एप्रिल रोजी नालासोपारा येथे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध सुरु होता. त्यावेळी या निषेध आंदोलनात वापरलेल्या पाकिस्तानी झेंड्यावरून हा आमच्या धर्माचा झेंडा आहे, तुम्ही वापरू शकत नाहीत,असे म्हणत या तरुणांनी वाद घातला घातला. त्यावेळी हिंदू- मुस्लीम दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी महेंद्रकुमार माली यांच्या तक्रारीवरून तीन तरुणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. पाकिस्तानी झेंडा आणि दहशतवादी कृत्याचे समर्थन करून, भारताची सार्वभौमत्ता, एकात्मता आणि अखंडता, धोक्यात आणण्याची कृती केली म्हणून तीन मुस्लिम तरुणावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे. भाजप युवा मोर्चा सचिव अशोक शेळकेंनी केली होती तक्रार. महेंद्र कुमार मालींच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications