विधान परिषदेत आक्रीत ,विरोधी पक्षनेत्यांकडून चक्क शिवीगाळ

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक आमदारांनी आपल्या अभ्यासू भाषणांनी एक गौरवास्पद आणि अभिमानास्पद परंपरा निर्माण केलीय. सभागृहात वादावादीचे प्रसंग घडतात. सभागृहाच्या कामकाजाचा तो एक भाग आहे.

Ambadas Danve

सत्ताधार्यांनी बहुमताच्या जोरावर मनमानी केली तर विरोधक घोषणाबाजी करतात, वेलमध्ये उतरतात, कागद आणि फलक फडकावतात, अपवादात्मक प्रसंगात राजदंड देखील पळवतात. आणि त्यानंतर पीठासीन अधिकारी संसदीय कामकाज मंत्र्यांशी विचार विनिमय करून संबंधित सदस्यांना शिक्षा ठोठावतात. 2009 साली मनसेच्या आमदारांनी हिंदीत शपथ घेणाऱ्या आमदार अबू आझमी यांना सभागृहात मारहाण केली होती. त्यानंतर ते निलंबित झाले होते. पण विरोधी पक्षानेत्यानेच समोरच्या बाकावरील सदस्यांच्या आई बहिणीचा उद्धार करून शिवीगाळ करण्याचे आक्रीत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडले नव्हते. ते काल घडले. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिलाच प्रसंग असावा.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे प्रसाद लाड यांना भिडले

विधान परिषद सभागृहात उबाठा गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. सभाघृहात नीलम गोऱ्हे पीठासीन अधिकारी असताना अंबादास दानवे आपले म्हणणे मांडत होते. एवढ्यात सत्ताधारी बाकांवरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या निषेध करण्यास सुरुवात केली. लाड यांचे हातवारे पाहून अंबादास दानवे चिडले. माझ्याकडे बोट दाखवायचे नाही असे सांगत ते लाड यांच्या दिशेने धावून गेले. या दरम्यान त्यांनी काही अपशब्द उच्चारल्याचे दिसून आले. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करून दोघांना थांबवले आणि त्यानंतर कामकाज तहकूब केले. :

शिवीगाळ केल्यानंतरही, अंबादास दानवे भूमिकेवर ठाम

सभागृहात केलेल्या कृत्याचे अंबादास दानवे यांनी ठाम शब्दात समर्थन केले. प्रसाद लाड यांच्यासारख्या बाटग्यानी मला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी लाड यांच्यावर टीका केली.माझ्याकडे बोट दाखवले तर ते मोडून ठेवायची ताकद माझ्यात आहे. मी शिवसैनिक आहे.'लाडा'त वाढलेलो नाही.असे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान अंबादास दानवे यांनी सभागृहात केलेल्या या कृत्याचे पडसाद सभागृहाबाहेर चांगलेच उमटले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दानवे यांच्या कृत्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

दानवेंचं निलंबन करा, प्रसाद लाड यांचे सभागृहाबाहेर धरणे

सभागृहात सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहाच्या पायर्यांवर धरणे धरले.सभागृहात आपल्या आईच्या नावाचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा त्यांनी निषेध केला. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असून, दानवेंनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यायला हवा!, त्यांचे निलंबन झाले पाहिजे तसेच त्यांनी सभागृहाची माफी मागायला हवी! अंबादास दानवे यांच राहुल गांधींच्या विधानाला समर्थन आहे का? विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याने अशी अर्वाच्च भाषा वापरणे कितपत योग्य आहे, असे सवाल लाड यांनी केले.

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांकडून खरपूस समाचार

नकली शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आई बहिणीवरून केलेली शिवीगाळ राज्याच्या आजपर्यंतच्या विधिमंडच्या इतिहासातील निंदनीय बाब आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी सभागृहाचीच नव्हो तर राज्यातील नागरिकांचीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. महाराष्ट्राचा बंगाल करायचा त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+