Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ऑपरेशन टायगर'ने टाकला मोठा गळ..? रवींद्र धंगेकर- उदय सामंत भेटीने चर्चा वाढल्या, नेमके काय झाले?

सध्या राज्यात फक्त शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने ठाकरे गटाला जेरीस आणले आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते सध्या शिंदे गटात सहभागी होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के दिले जात आहेत. शिंदे गटाने कोकणानंतर आता आपला मोर्चा पुण्याकडे वळविला असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील काँग्रसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची एका पंचतारांकीत हाँटेलमध्ये भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

Operation Tiger

ऑपरेशन टायगर पुण्यापर्यंत

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेचा शिंदे गट विरोधातील नेते आपल्या पक्षात घेत आहे. कोकणातील ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. आता कोकणानंतर शिंदे गटाने आपला मोर्चा थेट पुण्याकडे वळविला असल्याचे दिसत आहे. पुण्यातील काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता त्यांनी मंत्री उदय सामंत यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सही चर्चेत

पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या चर्चेत आहे. यासाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे विभाग ठरवून दिले आहे. मात्र नेत्यांच्या या यादीत काँग्रेसने धंगेकरांवर कोणतीच जबाबदारी दिली नाही. त्यामुळे काँग्रेसमधून धंगेकरांना डावलले जात असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे धंगेकर हेही काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आले होते. या स्टेट्समध्ये रवींद्र धंगेकर गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो होता. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल होणार असल्याची, चर्चा वाढली होती.

धंगेकरांनी केला इन्कार

काँग्रेसने डावलल्यानंतर पत्रकारांनी धंगेकरांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी काँग्रेस काहीतरी वेगळी जबाबदारी देणार असेल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो होतो. परवा अजित पवारांना देखील मी भेटलो. मी निरीक्षक म्हणून कधीच काम करत नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. निरीक्षक म्हणून पक्षाचे वरिष्ठ लीडर काम करत असतात. पक्षाला अहवाल देणे इतका मी मोठा नाही. कार्यकर्ता म्हणून माझ्यावरची जबाबदारी देतील ते मी पार पाडेल. मला योग्य वेळी पक्ष योग्य जबाबदारी देईल, असे धंगेकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे उदय सामंत यांची भेट ही मुलाच्या वाढदिवसानिमित्त झाली, असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+