Data Dump तंत्रज्ञानामुळे सापडला सैफवर हल्ला करणारा; नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? वाचा माहिती
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करुन फरार झालेल्या आरोपीबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर मुंबई पोलिसांनी या हल्ल्यातील संशयीत आरोपी जेरबंद केला. फक्त दोन सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचा माग शोधला. सहाव्या मजल्यावरील पायऱ्यांवर हा आरोपी कैद झाला होता. तेवढ्या फुटेजवर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हे सगळं शक्य झालं ते Data Dump तंत्रज्ञानामुळे... नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? त्याचीच ही माहिती.

संशयीत केला जेरबंद
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव शाहिद आहे. शाहीद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. शाहिदवर याआधी तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या त्यानेच सैफवर हल्ला केला का? कशासाठी हल्ला केला? या प्रश्नाची उत्तरे पोलिस शोधत आहेत. मात्र घटनेनंतर २४ तासांत हा संशयीत पोलिसांनी जेरबंद केला.
कसा सापडला आरोपी?
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्लेखोराला ओळखण्यासाठी Data Dump तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना सापडले. मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी हल्लेखोराची माहिती काढली. तीच माहिती नंतर सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन पक्की करण्यात आली.
काय आहे डेटा टम्प तंत्रज्ञान?
डेटा ड्रम्प या तंत्रज्ञानातून परिसरातील मोबाईल टॉवरचा एकत्रित डेटा मिळतो. पोलिसांनी हल्ल्यावेळचा सर्व मोबाईल टॉवरवरील डेटा ड्र्म्प घेतला. आरोपी सहाव्या मजल्यावरील पायऱ्यांवर दिसला होता. तेव्हा त्या परिसरात असलेल्या डाटाचा एकत्रित आभ्यास करण्यात आला. त्याआधारे पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहचली.
कसा झाला उपयोग?
मोबाईल फोन टॉवर सर्वत्र असतात. या टॉवरच्या मदतीने त्या परिसरातील सर्व सक्रिय मोबाईल फोनची माहिती मिळते. डेटा डंप तंत्रज्ञानात एखाद्या विशिष्ट ठिकाणी किती मोबाईल टाँवर आहेत व त्या टाँवरवर कोणत्यावेळी कोणते मोबाईल अँक्टीव्ह होते, याची माहिती मिळते. मोबाईल किती वेळ ॲक्टिव होता, तो कधी बंद झाला, याची माहिती मिळते. अर्थात हे तंत्रज्ञान केवळ फोन लोकेशन ट्रेस करण्यासाठी उपयोगी पडते. प्रत्येक मोबाईल टॉवर हा फोन कनेक्ट झाला की त्याचा डेटा स्टोअर करतात. जेव्हा कोणताही मोबाईल एखादा टॉवरशी कनेक्ट होतो. तेव्हा या टॉवरवर त्याचे एक खाते तयार होते.
आरोपीचे रेकाँर्ड मिळाले
डेटा डंपमध्ये जो डेटा स्टोअर होतो. त्यात फोनशी संबंधित सर्व माहिती जसे की IMEI क्रमांक, मॅक ॲड्रेस, आईपी ॲड्रेस और लोकेशन सह इतर डेटा जतन करण्यात येतो. विविध सॉफ्टवेअरचा वापर करून त्यातून युझर्सचा कॉल लॉग्स, टेक्स्ट मॅसेज, फाईल्स, ब्राऊझिंग हिस्ट्री आणि ई-मेल सारखी माहिती गोळा होते. सैफच्या घराच्या परिसरातील मोबाईल टाँवरवरुनच हल्ल्याच्यावेळी कोणते मोबाईल होते, हे पोलिसांनी शोधून काढले आणि संशयीत आरोपी सापडला.












Click it and Unblock the Notifications