Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

थर्टी फस्टला पहाटे पाचपर्यंत मनसोक्त प्या दारु; वाचा, पोलिसांकडून काय केलेत कठोर नियम

नव्या सरकारने नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यास परवानगी दिली आहे. ३१ डिसेंबरला पुणे जिल्ह्यातील दारुची दुकाने पहाटे पाच वाजेर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही परवानगी देताना कठोर नियमही घालून दिले आहेत. त्यामुळे नववर्षाचा जल्लोष साजरा करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे.

Thirty First

काय आहेत नियम

३१ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात दारुची दुकाने पहाटे पाचपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. परंतु सर्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर दारु पिऊन गोंधळ घालता येणार नाही. हे सर्व थांबविण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे. तसेच 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'विरोधात मोहीम राबवणार आहे. त्यामुळे दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांची खैर असणार नाही. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याचे नववर्ष कारागृहात जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचे नियोजन माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे शहरात २३ ठिकाणी 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे. पुण्यात पहाटे ५ पर्यंत दारू दुकानांना परवानगी दिली आहे. परंतु ड्रग्स आणि अल्पवयीन लोकांना दारू न देण्याचे आदेश दिले आहे. या सगळ्या नियमांचे पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे.

कसा असेल पोलिस बंदोबस्त

३१ डिसेंबर रोजी ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच ७०० वाहतूक पोलीस तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेराचा लाइव्ह मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते. त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोणाच्याही दबावाशिवाय कारवाई करण्यात येणार आहे.

हाँटेललाही नवी नियमावली

हॉटेल, परमिटरूम, क्लबच्या परिसरात त्या-त्या अस्थापनेने खासगी सुरक्षारक्षक तैनात कारावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.ध्वनिप्रदूषण, कायदा नियमांचे पान करणे आस्थापनांना बंधनकार राहील. वाढीव वेळेची परवानगी फक्त बंदिस्त जागेतील आस्थापनांना राहील. सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था याचा विचार करून योग्य वाटल्यास आवश्यकतेनुसार वेळेच्या बंधनामधील शिथीलता नाकारण्याचे अधिकार परवाना अधिकाऱ्यांना राहतील. डीजेंना रात्री बारापर्यंतच परवानगी राहणार आहे. मोकळ्या व सार्वजनिक जागेतील कार्यक्रमांना रात्री बारापर्यंत परवानगी राहणार आहे. विनापरवाना पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+