Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता बस्स ! मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू..मुद्द्यांचे बोला, पंकजा मुंडेंचं ट्टिट

मुंबई : प्रशिणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरु आहे. खेडकर कुटुंबाच्या अडचणीत दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत.त्यात या प्रकरणाची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली असून पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबाला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे याच्या चर्चा सुरु असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव समोर आहे. मात्र पंकजा मुंडे या भलत्याच भडकल्या असून त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

Mla Pankaja Munde

पंकजा मुंडे यांनी आपल्या एक्स सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे म्हणातात, "Abp माझा वर आणि इतर चॅनल वर मानहानी चा दावा करणार ..अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाही ही संकेत आहे..आता बस्स!!मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू..मुद्द्यांचे बोला..असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका.. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका...माझ्या वर 2014 पासून हे असेच करतात..पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र? असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिली आहे, अशा स्वरुपाच्या काही बातम्या समोर आल्या होत्या.तसेच खेडकर कूटूंबाचे पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र मुंडे यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावलं आहे. 'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला डॉ मनोरमा खेडकरांच्या नावाचा चेक मिळाला नाही. अशी कुठलीही रक्कम मुंडे प्रतिष्ठानमध्ये जमा नाही. मनोरमा खेडकर यांच्या नावाने मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांचा चेक देण्यात आला ही बाब खोटी आहे' असं स्पष्ट करण्यात आलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+