EVM व VVPAT मोजणीत तफावत नाही; मविआच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने केला खुलासा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताधारी पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएम मशीन वरून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. राज्यात केले जात असलेल्या आरोपांवर आता निवडणूक आयोगाच्या वतीने महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
ईव्हीएम मशीन आणि VVPAT मोजणीत कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर निवडणूक आयोगाने या संदर्भात पत्रक जारी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांनीय विभागातून पाच मतदान केंद्राची निवड करण्यात येते. त्यानुसार या पाच मतदान केंद्राच्या VVPATची मोजणी करणे अनिवार्य असते.

त्यानुसार राज्यभरातील सर्व विधानसभा मतदान केंद्रांमध्ये मोजणी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ही मोजणी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर झाली असून त्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत.
इतकेच नाही तर त्याचे सीसीटीव्ही फूटेज देखील असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या माध्यमातून निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
आयोगाकडून जारी पत्रकात काय म्हटले, वाचा संपूर्ण पत्र
- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमध्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे.
- या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा ह्या प्रक्रियेचा उद्देश आहे.
- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व 288 मतदारसंघामध्ये एकूण 1,440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आली आहे.
- मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 5 मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवाराच्या मतमोजणी प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली.
- या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंधानभील 5 मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही. असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्हा निवडणूक अधिकान्यांकडून प्राप्त झाले आहेत.
- ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- व्हीव्हीपॅट स्वीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजागी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे.












Click it and Unblock the Notifications