Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लाडकी'चा भरवसा नाय..! लाडकी बहिण योजनेवर नितीन गडकरींचं मोठं भाष्य, महायुती सरकारला घरचा आहेर

Nitin Gadkari's big comment on Mukhymantri majhi Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन मोठे स्टेटमेंट केले आहे. लाडकी चा भरवसा नाही असं म्हणत त्यांनी लाडकी बहिण योजनेवर आपलं मत व्यक्त केलं हे वक्तव्य म्हणजे महत्वाकांक्षी योजना राबवणाऱ्या महायुती सरकारला घरचा आहेरच आहे.

अनुदानाला कात्री..?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मात्र आता या योजनेवर विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिला या योजनेवर दुसरे तिसरे कुणी नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांमधल्या अनुदानाला कात्री लागल्याचं विधान गडकरींनी केलं आहे.

Nitin Gadkari s big comment on Mukhymantri majhi Ladki Bahin Yojana

विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांकडून डोकेदुखी

एकीकडे लाडकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत असून रोज आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लाडकी बहिण योजनेच्या भवितव्यासंदर्भात वक्तव्यावरुन आता विरोधकांनाही पाठबळच लाभलं असून राज्य सरकारची मात्र डोकेदुखी वाढली आहे. लाडकीवरून गडकरींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या आरोपांना आणखीनच पाठबळ मिळालं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+