Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नितीन गडकरींनी जन्मदिनी सांगितला भविष्यातील रोडमॅप, नागपूरबद्दल भावना, पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा

Nitin Gadkari Birthday PM Modi wishes : केंद्रीय सार्वजनिक रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा आज 27 मे 2025 जन्मदिवस आहे. या निमित्त राजकीय आणि विविध क्षेत्रातून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Nitin Gadkari Birthday PM Modi wishes

नितीन गडकरी यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान मोदींनी x हँडलवर लिहिले की, "भारतातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." यासह त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याबद्दलही त्यांनी शुभकामना दिल्या.

वाढदिवशी नागपूरबद्दल व्यक्त झाले नितिन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, "मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे, सर्वात मोठी संपत्ती माझी मित्र मंडळी आणि परिवार आणि आणि समाजातील सर्व घटकांनी माझ्या बद्दल शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ही माझ्या आयुष्यातील पुंजी आहे. हे आशीर्वाद मला नक्की समाजाकरिता आणि देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत आहे. आणि जो पर्यंत मला काम करता येईल तो पर्यंत मी काम करत राहणार. या समाजातला शेवटच्या तळागळा पर्यंतच्या माणसापर्यंत त्यांचं जीवन बदलविण्या करिता जे काम मला करता येईल ते काम करत राहणार आहे."

Nitin Gadkari Birthday PM Modi wishes

भविष्यात या गोष्टीवर करणार गडकरी काम

नितीन गडकरी म्हणाले, "भविष्यकाळात ऑरगॅनिक फार्मिंग,सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव ,अडवांटेज विदर्भ ,ऍग्रो व्हिजन ,ज्येष्ठ नागरिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न आहे ."

नागपूर माझं जन्मस्थान आणि हृदयस्थान

नितीन गडकरी म्हणाले, "नागपुरात लवकरच सात मंजली इमारत तयार होत आहे आणि तेथे संगीत, नृत्य ,नाटक क्षेत्रातील सर्व कलाकारांना निशुल्क सोय उपलब्ध होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. नागपूर हे माझं जन्मस्थान आणि हृदय स्थान आहे. नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशांमध्ये काम करू शकलो या जनतेला माझा परिवार मानतो. जात पंत धर्मभाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे."

अर्थव्यवस्थेवर नितीन गडकरी यांचे भाष्य

नितीन गडकरी म्हणाले, "पुढील काळामध्ये आत्मनिर्भर भारत आणि फाईव्ह ट्रिलियनस डॉलरची अर्थव्यवस्था व्हावी, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. भारत विश्वगुरू झाला पाहिजे खऱ्या अर्थाने आपल्या देशात जी प्रोटीन्शिअल आहे आणि येत्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल"

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+