केरळ हे मिनी पाकिस्तान, प्रियंकांना मत देणारे अतिरेकीच... नितेश राणेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
भाजपचे आ. नितेश राणे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहेत. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच राहुल गांधींची बहिण तेथून निवडून आली, असं वक्तव्य त्यांनी केलं. पुण्यातील सासवड येथे एका कार्यक्रमासाठी नितेश राणे आले होते. मात्र राणे यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा वाद वाढला आहे.

काय म्हणाले राणे
पुण्यातील सासवड येथे अफजलखान वधाच्या पोस्टर्स प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितेश राणे यांनी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं. ते म्हणाले, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. सगळे अतिरेकी काँग्रेसला मतदान करतात. दहशतवाद्यांना हाताशी धरुन ते लोक खासदार होतात. अतिरेक्यांनी मतदान केलं म्हणूनच राहुल गांधींची बहिण (प्रियंका गांधी) निवडून आली.
आम्हाला इशारे का देताय
राणे पुढे म्हणाले, या राज्यात हिंदूत्ववादी सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कडवट हिंदू आहेत. आम्हाला टोकाची भाषणे देऊ नका, असा इशारा आता कुणी देऊ नका. जो कायदा अन्य धर्मियांसाठी आहे, तोच कायदा आम्ही हिंदू धर्मियांसाठी हवा. आमच्या देशात ८५ टक्के हिंदू असूनही हिंदूवरच मर्यादा घातल्या जातात. कायदा सगळ्यांना सारखाच लावा, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
अफजलखान वधाचे पोस्टर्स लावायचे कुठे
राणे आपल्या भाषणात म्हणाले, अफजलखान वधाचे पोस्टर्स येथे लावले आहे. त्याच कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. अफजलखान वधाचे पोस्टर्स लावू नका, त्यामुले धार्मिक भावना दुखावतील, असं स्थानिक प्रशासनाने मला सांगितलं. मात्र आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग आम्ही अफजलखान वधाचे पोस्टर्स लावणार नाहीत, तर काय पाकिस्तानमध्ये लावणार का..? दोन-चार टकल्यांच्या भावना दुखावणार असतील तर त्यांनी पाकिस्तान-बांग्लादेशमध्ये जाऊन दाढी कुरवळावी, असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications