Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nitesh Rane Biography : नितेश राणेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ, हिंदुत्ववादी नेते; वाचा त्यांची कहाणी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि तळ कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्या वेळा जिंकणारे नितेश राणे यांनाही महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा 58 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्रत असलेले नितेश राणे यांचा 2014 साली राजकारणात प्रवेश झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे जेष्ठ बंधू निलेश राणे यांचा पराभव झाला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून तर नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला तर नितेश राणे हे भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा पराभव करून विधानसभेत गेले. आक्रमक आमदार म्हणून पहिल्यापासूनच नितेश राणे यांनी आपली ओळख निर्माण केली.

Nitesh Rane Biography

2019 साली भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नितेश राणे विधानसभेत गेले. महाविकास आघाडी सरकारशी त्यांनी मुकाबला केला. देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून नितेश यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नितेश यांच्या मुसक्या आवळण्याचा खूप प्रयत्न केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना एका आरोपात गोवण्यात आले. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणे यांच्या पॅनलने जिंकली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवून केलेली अटक, राणे यांच्या जुहू येथील घरावर काढण्यात आलेला मोर्चा अशा घटनांमुळे राणे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष ठळक झाला होता. यात सुमारास आक्रमक हिंदुत्ववादी भाषणे करून हिंदूंचा तरुण नेता म्हणून नितेश राणे आपली ओळख निर्माण करू लागले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी दिली आणि त्यांनी पारकर यांचा पराभव केला.

आक्रमक हिंदुत्ववादी वक्तव्यामुळे निलेश नितेश राणे अलीकडच्या काळात चर्चेत आले आहेत. रामगिरी महाराजांच्या विधानांचे त्यांनी ठाम शब्दात समर्थन केले. त्यांच्या वक्तव्यांची दखल घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी काही संघटनांनी लावून धरली होती. त्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना देण्यात आले होते. या मागणीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मान्यता दिल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे आक्रमक झाले असून. आता हिंदुत्ववादी सरकार आले आहे त्यामुळे भोंगे खाली उतरवा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+