Nitesh Rane : नितीश राणेंवर चिथावणीखोर भाषण, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, 2 गुन्हे नोंद
Nitesh Rane :भाजप आमदार नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंवर चिथावणीखोर भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 302, 153 आणि इतर कलमांखाली आमदार नितीश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीश राणे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुस्लिमांना खुलेआम धमकी दिली राणेंविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एक गुन्हा श्रीरामपूर पोलिस स्टेशन तर दुसरा अहमदनगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

मुस्लिम समाजाला उघड धमकी
रविवारी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर नितीश राणेंची सभा झाली, त्यात त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली. राणे म्हणाले, 'आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी काही बोलले तर आम्ही सोडणार नाही.
महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबरावर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत महाराजांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप नेते नितीश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
लव्ह जिहादला बळी न पडण्याचे राणेंचे आवाहन
महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवार अहमदगरमधील श्रीरामपूरमध्य् मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपल्या मुलींनी लव्ह जिहादला बळी पडू नये, ज्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होत असेल तर त्याच ठिकाणी ठेचा, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले. आ. राणे म्हणाले की, लव्ह जिहादमध्ये आपल्या भगिनींना फसवून त्यांचे आयुष्य खराब करत असतात. अशा जिहादला आपल्यातून फेकून द्या, हिंदू धर्म म्हणून आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे.
हिंदू धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्या मागे उभे राहावे- राणे
या मोर्चा दरम्यान आ. राणे म्हणाले की, हिंदू धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे. महंत रामगिरी महाराज काय चुकीचे बोलले, हे समजत नाही. अशा वक्तव्यामुळे एवढ रान माजविण्याचे काहीच कारण नाही. या वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांना धमक्या दिल्या जात आहेत. महाराजांच्या केसाला जरी धक्का लावला तर.. असा इशारा राणें यांनी देत लहान मुलांच्या धर्मांतरणाबाबतही भाष्य केले होते.(Nitesh Rane )












Click it and Unblock the Notifications