Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भुजबळ, वळसे पाटलांना डच्चू..! वाचा, अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून 10 आमदार मंत्री होणार आहेत. त्यापैकी अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज उर्वरित 9 मंत्र्‍यांनी शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 40 आमदार हे निवडून आले होते. त्यापैकी 10 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

Maharashtra Cabinet Expansion

या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी सुरुवातीलाच भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. कारण भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाल होता. अशावेळी त्यांनी सुरुवातीलाच भाजपच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटपात त्यांना तब्बल 10 मंत्रिपदं मिळाल्याचं दिसून येत आहे. आज धनंजय मुंडे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

या दिग्गजांचा केला पत्ता कट

अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. त्यांनी अनेकदा जाहीर सभेमधून अजित पवार यांची बाजू मांडली, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणखी एक मोठे नेते दिलीप वळसे पाटील यांना देखील वगळण्यात आलं आहे. उठावाच्या वेळी दिलीप वळसे पाटील देखील अजित पवारांसोबत ठामपणे उभे होते. मात्र नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोघांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+