नारायण राणेंच्या शपथविधीनंतर, मुलाची वडीलांसाठी भावनिक पोस्ट
मुंबई :भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे.

तुम्हाला सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. तसेच खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून कोकणासाठी काम करणार असल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं.
निलेश राणे आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हणतात...
१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार.
ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही.
तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही.
जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही.
कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार.
तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे.












Click it and Unblock the Notifications