मोठी बातमी... निलेश राणे करणार शिंदे गटात प्रवेश, दोघे भाऊ उतरणार रणांगणात

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी ही माहिती दिली. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

निलेश राणेंचा शिंदे गटात उद्या प्रवेश

निलेश राणे हे शिंदे गटात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. निलेश राणे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. पाच वर्षांपूर्वी नारायण राणे आणि नितेश राणे हे भाजपमध्ये गेले होते. मात्र आता कुडाळ-मालवण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत, वडील नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

Nilesh Rane

केवळ विकासासाठी घेतला निर्णय

पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी आपल्या पक्षबदलाचे कारण सांगितले. ते म्हणाले, माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता. मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार आहे. पक्ष हितासाठी जे करायचं आहे, ते मी करेन. निलेश राणे उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे तसा आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आहे. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना यायचं आहे ते येणार असल्याचंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.

कुडाळ-मालवण मधून निवडणूक लढवणार

निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या सोशल मीडियावरील भाजप चिन्हाचे असलेले पोस्टर्स हटवले आहे. आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह असलेले पोस्टर्स त्यांनी अपलोड केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+