सुजय विखेंचे आव्हान लंकेंनी स्विकारले, फाडफाड इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ

Mumbai: महाराष्ट्रातील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिण. या मतदारसंघात विखे परिवाराच्या बलाढ्य किल्ल्याला यंदा शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी सुरूंग लावला. सुजय विखेंना पराभूत करत ते जायंट किलर ठरलेत.

nilesh lanke oath in english

निवडणूक प्रचारात सुजय विखे यांनी इंग्रजीच्या मुद्द्यावरून निलेश लंके यांना हिणवल होत. त्यामुळे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना खूपच रंगला होता. संसदेत इंग्रजीतच बोलाव लागत असं नाही तर मातृभाषेतही बोललेल चालत असा शब्दांत खुद्द शरद पवारांनी निलेश लंकेंची पाठराखण करत सुजय विखेंना टोला लगावला होता.

काल सोमवारी २४ जूनपासून संसदेच अधिवेशन सुरू झालं. नवनियुक्त खासदारांनी कालपासून शपथ घ्यायला सुरूवात केली. आज २५ जून मंगळवारी अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनीही खासदारकीची शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे त्यांनी चक्क फाडफाड इंग्रजीत शपथ घेतली.

निवडणूक प्रचारा दरम्यान डॉ.सुजय विखे यांनी "मी जेवढं इंग्रजी बोलतो, तेवढं समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही," असे म्हणत निलेश लंके यांना आव्हान दिले होते.

यानंतर आता नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे-पाटील यांचे आव्हान स्वीकारत संसदेत महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही शपथ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

रामकृष्ण हरी म्हणत केला शेवट

दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पायऱ्यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले

दरम्यान, निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत २८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान आता लंके यांनी विखेंचे इंगजीतून बोलण्याचे आव्हान पूर्ण केल्याने आगामी काळात त्यांच्यातील ही राजकीय लढाई आणखीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+