पंकजा मुंडे यांच्याकडे एकही गाडी नाही, पण शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक
मुंबई: बीड लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानभवनात येऊन विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रातून पंकजा मुंडे यांच्याकडे संपत्ती किती आहे याचा तपशील समोर आला आहे.

पंकजा मुंडे यांच्या संपत्तीचा सविस्तर तपशील
पंकजा मुंडे यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल 45 तोळे सोने असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञाप्रत्रामद्ये त्यांच्या नावावर विविध बॅंक खात्यात ठेवी आहेत. यामध्ये 91 लाख 23 हजार 861 रुपये आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या नावावर 1 कोटी 28 लाख 75 हजार 694 रुपयांचे विविध शेअर आणि म्यूचलफंड आहेत. पंकजा मुंडे यांच्यावर सुमारे पावणे चार कोटींचं कर्ज आहे. त्यांच्याकडे स्वत:ची एकही गाडी नाही. स्थावर व जंगम मिळून त्यांची संपत्ती सुमारे 6 कोटी रुपयांची आहे.
पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व समाजसेवा आहे. शेती, भाडे व माजी विधानसभा सदस्यांचं निवृत्तीवेतन हा त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. तर पंकजा मुंडे यांच्या नावावर 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 रुपयांचे कर्ज आहे. तर पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयांचे बॅंक कर्ज आहे. तसेच त्यांच्या पतीच्या नावावर 24 कोटी 77 लाख 75 हजार 918 रुपयांचे वैयक्तीक कर्ज आहे.












Click it and Unblock the Notifications