नीलम शिंदे यांच्या कुटुंबाला इमर्जन्सी व्हिसा मिळाला, कुटुंब 1 मार्चला अमेरिकेला रवाना होणार
Neelam Shinde accident news: अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थिनी नीलम शिंदेच्या कुटुंबाला शुक्रवारी आपत्कालीन व्हिसा मंजूर केला आहे. व्हिसा मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब शनिवारी (ता.1 मार्च) ला अमेरिकेला रवाना होणार आहेत. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गंभीर रस्ते अपघातानंतर विद्यार्थिनी नीलम शिंदे यांच्या रुग्णालयात उपचार सुरु असून ती सध्या कोमात आहे.
नीलमचे वडील तान्हाजी शिंदे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहीतीनुसार, "16 फेब्रुवारी रोजी मला तिच्या रूममेटचा फोन आला. मात्र, तिने मला अपघाताबद्दल सांगितले नाही. नंतर त्यांनी नीलमच्या काकांना याबद्दल माहिती दिली. ती अजूनही कोमात आहे, परंतु तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे.

" नीलमचे वडील यांनी म्हणाले की, आम्ही इथे दूतावासात पोहोचलो आहोत. त्यावेळी त्यांनी आमची मुलाखत घेतली आणि अर्ध्या तासात व्हिसा जारी केला. आता आपण उद्या (शनिवारी) अमेरिकेला निघणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
वडिलांनी मानले सरकारचे आभार
तानाजी शिंदे यांनीही व्हिसा मिळाल्याबद्दल केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. 'केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने आम्हाला खूप मदत केली. माध्यमांनीही आम्हाला मदत केली. माझी मुलगी कोमात आहे. आपण फार काही करू शकत नाही. तो लवकर बरी व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.
नीलम शिंदे ही महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी नीलम शिंदे 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून ती रुग्णालयात कोमात आहे. रिपोर्ट्सनुसार नीलमच्या डोक्याला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. जेव्हा कुटुंबाला हे कळले तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली. कुटुंबाच्या आवाहनावरून परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अमेरिकेसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर कुटुंबाला आपत्कालीन व्हिसा देण्यात आला आहे
आरोपीला पोलिसांनी अटक केली
नीलम शिंदे यांना गाडीने धडक देणाऱ्या आरोपीला अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सॅक्रामेंटो पोलिस विभागाने आरोपी लॉरेन्स गॅलोज (58) याला अटक केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी फेअर ओक्स बुलेव्हार्डवर नीलमला जोराची धडकी दिली होती. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून 24 तासांच्या आत त्याला अटक केली आहे..












Click it and Unblock the Notifications