Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वैष्णवीच्या आई वडीलांची भेट घेताच नीलम गोऱ्हे यांचे राज्य महिला आयोगावर ताशेरे, नेमकं काय म्हणाल्या?

Neelam Gorhe targets on Rupali Chakankar : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तिच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढले.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, वेळीच जर मयुरीच्या बाबतीत कारवाई झाली असती तर वैष्णवीची घटना घडली नसली, त्यावेळी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विचार झाला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आपल्याच महायुतीतील नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढले.

Neelam Gorhe

काय म्हणाल्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे?

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महिला आयोगाची कार्यपद्धती, महिला आयोगानं कशा प्रकारे काम करायला हवं यावर त्यांनी परखड मत मांडले. नीलम गोऱ्हे यांनी न्याय संस्थेकडे पोहोचत असताना, पोलीस स्टेशन, दिवाणी स्वरुपाचा कौंटुबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, बाकीच्या निर्वाहासाठी असलेल्या योजना अशा अनेक भाग आहेत.

महिला आयोगाच्या सदस्यांची नेमणूक व्हावी

राज्य महिला आयोगाचं काय चूक आणि बरोबर हे ट्रायल बाय मीडिया, ट्रायल बाय सोसायटी होऊ नये, मात्र, ते जे काही काम करत आहेत, त्यात अजून काही तज्ज्ञ लोकांकडून अनुभवी लोकांना विश्वास घेऊन त्या सामाजिक संस्था महाराष्ट्रात ज्या 100-200 आहेत ज्या संस्था विजया रहाटकर जोडून घेतल्या होत्या, त्यांना सातत्यानं या कामात विश्वास वाटेल यासाठी बैठक घेतली पाहिजे.

सध्याच्या महिला अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणं आवश्यक आहे आणि अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदं देखील रिक्त असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले.

महिला आयोगाने हे करायला हवं होतं

राज्य महिला आयोगाने जसं पोलिसांना सांगितले. तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता.

पोलिसांनी केलं नाही हे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे सगळ्यांनी मिळून वाढवणं गरजेचं आहे. मीडिया, आम्ही, महिला संघटना सगळे आलो, सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सगळ्या पोलीस दलावर टीका करुन पोलीस दलाचं नीतीधैर्य खच्ची करु नये. काही ठिकाणी आम्हाला असं दिसलंय की वरिष्ठ स्तरावरचे सीपी आणि एसपी सोडून काही ठिकाणी असं दिसलंय, काही लोकांनी तक्रार केली आहे. काही पोलीस स्टेशनला आर्थिक दृष्ट्या बाहुबलींनी वर्चस्व मिळवलं आहे, असेही त्या म्हणाल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+