शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर! बारामतीतून युगेंद्र पवार
NCP Sharad pawar party First Candidate List announced : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी आज पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या अनुमतीने जाहीर केली. बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून एकूण 45 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता काका विरुद्ध पुतण्या (अजित पवार- युगेंद्र पवार) यांच्यात लढत होणार आहे.
जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. यासह या यादीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जुन्या जाणत्या आणि दिग्गज नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे.

आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार
- जयंत पाटील - इस्लामपूर
- अनिल देशमुख- काटोल
- राजेश टोपे- घनसावंगी
- बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
- जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
- शशिकांत शिंदे - कोरेगाव
- जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
- गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
- हर्षवर्धन पाटील- इंदापूर
- प्राजक्त तनपुरे -राहुरी
- अशोकराव पवार- शिरुर
- मानसिंगराव नाईक- शिराळा
- सुनील भुसारा- विक्रमगड
- रोहित पवार- कर्जत जामखेड
- विनायकराव पाटील- अहमदपूर
- राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
- सुधाकर भालेराव- उदगीर
- चंद्रकांत दानवे- भोकरदन
- चरण वाघमारे- तुमसर
- प्रदीप नाईक- किनवट
- विजय भांबळे-जिंतूर
- पृथ्वीराज साठे- केज
- संदीप नाईक- बेलापूर
- बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
- दिलीप खोडपे- जामनेर
- रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
- सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
- रविकांत बोपछे- तिरोडा
- भाग्यश्री अत्राम- अहेरी
- बबलू चौधरी- बदनापूर
- सुभाष पवार- मुरबाड
- राखी जाधव- घाटकोपर पूर्व
- देवदत्त निकम- आंबेगाव
- युगेंद्र पवार - बारामती
- संदीप वर्पे- कोपरगाव
- प्रताप ढाकणे- शेवगाव
- राणी लंके- पारनेर
- मेहबूब शेख- आष्टी
- करमाळा-नारायण पाटील
- महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
- प्रशांत यादव- चिपळूण
- समरजीत घाटगे - कागल
- रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
- प्रशांत जगताप -हडपसर












Click it and Unblock the Notifications