लाडकी बहिण बनवायचा दिंडोरा पिटतोय! सरकारदादा तू भाऊ म्हणून लायक ठरला नाही- 'या' पक्षाची टीका
ladki bahin yojana : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं एकनाथ शिंदे सरकारच्या लाडकी बहिण योजनेवरुन जोरदार टीका केली आहे. रक्षाबंधनाच्या एकदिवस आधी पक्षाच्या एक्स हँडलवर आज एक व्हिडिओ पोस्ट केला, यात "दीड हजार देऊन लाडकी बहिण बनवण्यासाठी दिंडोरा पिटतोय सरकारदादा तू भाऊ म्हणून लायक ठरला नाहीस." असे म्हणत व्हिडिओद्वारे शाब्दिक हल्ले चढवले आहेत.
उद्या रक्षाबंधन असून लाडकी बहिण योजनेद्वारे राज्य सरकारने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकायला सुरुवात केली आहे. ही योजना म्हणजे निवडणूक जुमला असल्याचे सांगत विरोधक टीका करत आहेत. आज एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर विरोधकांनी पुन्हा निशाणा साधला आहे.

असा आहे मजकूर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या एक्स हँडलवर व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "प्रिय सरकार दादा, बहिणी आपल्या माहेरी येऊन भावाला राखीचं स्नेहबंधन बांधून आपल्या रक्षणाचा आव्हान करते, पण तुझ्या या अभागी बहिणी मात्र उद्या तुला राखी बांधू शकणार नाही कारण अरे दादा माझ्यासारख्या महाराष्ट्रातील एक लाख 91 हजार 433 असलेल्या बहिणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत.
गलीच्छ शेऱ्यांनी आम्ही घायाळ..
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "गत वैभवाचा गौरवशाली वारसा मिळवणाऱ्या आपल्या देशातून सुद्धा दादा तू वचन दिलं होतं की मी तुमचं रक्षण करीन पण आज तुझ्या निष्क्रियतेने आणि दुर्लक्षाने आमच्या अस्तित्वालाच आव्हान दिले सरकार दादा आम्ही आई बहीण बायको आणि मुलगी या साऱ्या भूमिका लिलल्या पार पाडल्या पण तू मायबाप सरकार म्हणून माझं रक्षण करण्यास अपयशी ठरलास. तुझ्या जिवलग मित्रांच्या गलिच्छ शेऱ्यांनी आम्ही आधीच घायाळ झालो आहोत."
महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या 'अभागी' बहिणीचं खुलं पत्र ! #लाडकी_बहीण #बेपत्ता_बहीणी #MissingGirls pic.twitter.com/BgvKBHo1EY
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 18, 2024
षंढ वृत्तीमुळे अत्याचार वाढले!
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "ज्या मद्यामुळे बहिणींचा संसार उध्वस्त झाला त्या मद्याच्या ब्रँडला महिलांचे नाव द्या, मग मद्याचं खप वाढेल असं अपमान झलक सल्ला देणारा तुझा मित्र गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर तू शांतच राहिलास.. तुम्ही प्रपोज करा जर नकार दिला तर घरातून पळवून न्या असं वक्तव्य करणाऱ्या राम कदमांवर तू का नाही तुटून पडलास, तुझ्या या षंड वृत्तीमुळे आमच्यावरील अत्याचाराची संख्या वाढत चालली तुझे राजकीय सहकारी महिला अत्याचाराचे आरोपी असताना तू त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेचा आस्वाद घेतोय."
तुझ्या काळजाला पाझर फुटत नाही का?
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "तुझी बहीण अल्पवयीन असून प्रौढ पण निघून अत्याचार कमी होतच नाही. शहरांमध्ये याच तुझ्या बहिणी लोकल प्रवासात गुरा-ढोरांप्रमाणे प्रवास करतात अक्षरशः नरकयातना भोगतात, तसंच आजही दुर्गम भागात गरोदर मातेला कावडीतून रुग्णालयात न्यावं लागतं, तरी तुझ्या काळजाला पाझर फुटत नाही इतका कसा रे तू निष्ठूर? बेटी बचाव बेटी पढाव अशा भाषणांमध्ये घोषणांमध्ये दिसणारी बेटी महाराष्ट्रात दिसेनाशी झाली आहे मग काय अर्थ राहिला त्या पहिली बेटी धनाची पेटी या उक्तीला."

तू सत्ता कारण दिल्लीवारीत इतका व्यस्त..
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "आम्ही तर बेपत्ता आहोत पण ज्या आपल्या घरी आहेत अशा बहिणींची पण तू काळजी घेत नाहीस, महागाईने गरीब बहिणींचं पार कंबरडं मोडले कराच्या बोजा वाढल्यानं मध्यमवर्गीय बहिणींचा कणा मोडलाय, अशा बातम्या ऐकू आल्या की मन सुन्न होतं. तू सत्ता कारण दिल्लीवारीत इतका व्यस्त आहेस की तुला आमचा शोध घ्यावाच देखील वाटत नाही."
दीड हजारांत बहिण भावाच्या पवित्र नात्याला जोडू नकोस
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "काय पण म्हण सरकार दादा पण तू भाऊ म्हणून लायक ठरला नाहीस.. आणि एवढं होऊन सुद्धा आता दीड हजार रुपये देऊन मला लाडकी बहीण बनवण्यासाठी तू महाराष्ट्रभर दिंडोरा पिटतो आहेस, पण ते घेण्यासाठी आम्ही आहोत तरी कुठे येतं सत्ता, स्वार्थ सोडून थोडासा प्रयत्न केला असता तर सापडलो असतो आम्ही अरे सरकार दादा आमची तुला एकच विनंती आहे, सत्तेचा लोभ सोडून दीड हजार रुपयांमध्ये बहिण भावाच्या पवित्र नात्याला जोडू नकोस."
आमच्यासाठी एवढं कर..
व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले की, "आमच्यासाठी काय करायचं असेल तर एक आम्ही शाळा कॉलेजात जाताना सुखरूप परत येऊन आमचे विनयभंग होणार नाही, खड्डेयुक्त रस्त्यांवर आमचा जीव जाणार नाही, आमच्या मुलांवर नवऱ्यांवर बेकारीची वेळ येणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कर. ...धन नको धोरण दे - तुझीच एक बेपत्ता अभागी बहीण."












Click it and Unblock the Notifications