अजित पवारांची दिल्लीत खलबतं! NCPच्या संभाव्य मंत्र्यांची नावं निश्चित, काय ठरलं बैठकीत, वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापासून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?, हा सस्पेंस बुधवारी अर्थात 4 डिसेंबरला संपणार आहे. बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत सकाळी ही बैठक होणार आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केली जाईल. मात्र याआधीच खातेवाटपासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.
आज अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक होत आहे. यात खातेवाटपावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच पक्षातील काही नेत्यांची नावे समोर आली आहेत. ज्या नावांची आज दिल्लीत चर्चा झाली आहे.

दिल्लीच्या बैठकीत कोण कोण होते?
खा. सुनील तटकरे हे प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर अजित पवारही प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते. खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांच्या संभाव्य नावावर चर्चा झाली आहे. पक्षाच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद मिळावीत ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्यात सुरुवातीला पहिल्यावेळी 7 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण असावं यावर बैठकीत चर्चा झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य मंत्री :
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनिल नाईक
मकरंद पाटील












Click it and Unblock the Notifications