'शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही'; त्यांना अक्कल नाही; रुपाली ठोंबरेंचा घणाघात
Ncp Leader Rupali Thombre Attacks BJP MP Medha Kulkarni : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आवारात कथित नमाज पठण करण्याच्या घटनेवरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट शनिवार वाड्यात दाखल होत मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी कुलकर्णी यांच्यावर समाजात जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

मेधा कुलकर्णींच्या आंदोलनावर आक्षेप
शनिवार वाड्यात काही अज्ञात महिलांनी नमाज पठण केल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी 'X' (ट्विटर) वर व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह शनिवार वाड्याबाहेर निदर्शने करत गोमूत्र शिंपडून आंदोलन केले.
'शिक्षिका असून अक्कल नाही'
रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर व्यक्तिगत टीका करत त्यांच्या राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मेधा कुलकर्णी यांच्यासोबत मी महापालिकेत २०१२ ते २०१७ दरम्यान एकत्र काम केलेले आहे. त्या शिक्षिका आहेत, पण त्यांना तेवढी अक्कल नाही हे कालच्या प्रकरणावरून दिसून आले. मेधा कुलकर्णी यांना बोलायला त्यांच्या पक्षातील लोकसुद्धा घाबरतात."
ठोंबरे यांनी कुलकर्णी यांना लक्ष्य करताना स्पष्ट शब्दांत सांगितले, "शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही." तसेच, "हिरव्या रंगाचा भाजपला एवढा राग का आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गुन्हेगारी, वाहतुकीवर आवाज का नाही?
रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर केवळ जातीय तेढ निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, "या मेधा कुलकर्णींना कुठे लोकात जायचं आहे? त्यांच्याकडे कुठे नागरिक प्रश्न घेऊन जातात? मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, पाणी, रस्ते यावर आवाज का नाही उठवला?"
त्यांनी पुढे म्हटले की, "प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल इतकंच काम मेधा कुलकर्णी करतात. दोन समाजात तेढ निर्माण होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप खासदाराच्या विरोधात भूमिका घेणारच."
मजार अनधिकृत नाही, जुना पुरावा सादर
रुपाली ठोंबरे यांनी यावेळी शनिवार वाड्यातील कथित 'अनधिकृत मजार' वादावरही स्पष्टीकरण दिले. मेधा कुलकर्णी यांनी ज्या मजारीवर भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला, त्यासंदर्भात रुपाली ठोंबरे यांनी पुरावे सादर केले. त्या म्हणाल्या की, "पुरातन विभागात शनिवारवाडा येथील मजार ही १९३६ साली नमूद (नोंद) आहे. ही नोंद सदाशिव पेठेतील चित्रशाळा प्रेस इथे झाली आहे. माझा जन्म सोडा हो, खासदार बाई सुद्धा जन्मलेल्या नव्हत्या."
गुन्हा दाखल करण्याची मागणी
रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. "पुण्यातील हिंदु मुस्लिम तेढ निर्माण करणाऱ्या खासदार मेधा ताईंवर तेढ निर्माण करणे, सामाजिक शांतता भंग करणे यासाठी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची भूमिका कायम आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
"मी हिंदू आहे आणि गर्वसे म्हणतो आम्ही हिंदू आहे. पण धर्मा-धर्मात तेढ, भेद निर्माण करणारे, सामाजिक शांतता भंग करणारे हिंदू नक्कीच नाही. नौटंकी, नाटके करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवायचे," अशा कठोर शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर घणाघात केला.
-
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications