मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला ट्रॅव्हलची जोरदार धडक, जयश्री मुंडे किरकोळ जखमी
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कार आणि ट्रॅव्हलचा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी जवळ कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या अपघातात सुदैवाने राजश्री मुंडे मोठी झाली नसल्याची माहिती आहे. राजश्री मुंडे यांनी किरकोळ दुखापत झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या अपघातात मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झालं आहे. या अपघातानंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र पहाटेच्या सुमारास त्याच्या कार आणि ट्रॅव्हलचा अपघात झाला. हा पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी जवळ घडला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications