Baba Siddique Death : NCPचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळी घालून हत्या, मुलाच्या ऑफिससमोर घडला
Baba Siddiqui : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांच्या मुलाच्या ऑफिससमोरच त्यांच्यावर गोळीबार झाला, यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. दरम्यान, पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन फायर राऊंड, छातीत लागली गोळी
लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या अजित गटात प्रवेश केला. ते तीन वेळा काँग्रेसचे आमदार आणि वांद्रे पश्चिममधून मंत्रीही राहिले आहेत. काँग्रेसमधील मतभेदानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता अवघ्या काही महिन्यांनंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सिद्दीकी यांच्यावर ज्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा मुलगा झीशान याचे कार्यालय असल्याचे सांगण्यात येत आहे. जीशान हे वांद्रे पूर्वचे आमदार आहेत. ते आपल्या मुलाच्या कार्यालयातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या छातीत गोळी लागली. यात ते गतप्राण झाले.
Maharashtra | NCP Senior leader Baba Siddique has been fired upon by unidentified people. He has been admitted to the nearby Lilavati Hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) October 12, 2024
Further details awaited.
एका सहकाऱ्याच्या पायालाही लागली गोळी
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री 9 वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. अभिनेता संजय दत्तदेखील रुग्णालयात दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच केला होता NCP मध्ये प्रवेश
काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अचानक राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला होता. दुसरीकडे गोष्ट म्हणजे बाबा सिद्दीकी यांची केवळ राजकारणातच चालते असं नाही. च्या शब्दाला बॉलिवूडमध्येही खूप मान होता. त्यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सर्व बॉलिवूड स्टार येत असत. सलमान खान, शाहरुख खान यांसोबत अनेक मोठे कलाकार बाबा सिद्दिकींच्या रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीला हजर राहतात. त्यांचा मुलगा जीशानदेखील मुंबईतील बांद्रा पूर्वमध्ये आमदार आहे. ते मूळचे बिहारचे आहेत. ते आपल्या गावी म्हणजे बिहारची राजधानी पटनामध्येही इफ्तार पार्टी आयोजित करत असतात. त्यांना अर्शिया नावाची मुलगीही आहे जी डॉक्टर आहे. त्यांची पत्नी शहजीन गृहिणी आहे.












Click it and Unblock the Notifications