Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राष्ट्रवादी कुणाची शरद पवारांची की अजित पवारांची? घड्याळ कुणाला मिळणार आज सर्वोच्च न्याालयात सुनावणी

NCP Dispute Supreme Court Hearing Today Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा शरद पवारांची की अजित पवारांचा? घड्याळ हे चिन्ह कुणाला मिळणार याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) याबाबतचा निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्या आधीच हा निकाल येण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. तसे झाल्यास आगामी निवडणुकीत दोन्हीपैकी कुण्या एकाच पक्षाला जास्त फायदा होणार आहे.

NCP Dispute Supreme Court Hearing Today Update

आज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी पक्षासह घड्याळ चिन्हाबाबत सुनावणी होणार होत असतानाच जर येत्या काही दिवसांत निकाल आला तर राष्ट्रवादी कुणाची यावरचा पडदा कायमचा उठणार आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिवसेना पक्षातून फुटून नंतर पक्षावरच दावा केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात निकालही दिला होता. आता हाच कित्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गिरवत आहेत. एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी पक्षावर आपला दावा ठोकला होता, त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच असल्याबाबत निवडणूक आयोगाने निर्वाळा दिला होता. त्यानंतर नेहमीच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आली असून आजही यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडत 40 हून अधिक आमदार आपल्याबाजूने करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आधी निवडणूक आयोगात याबाबत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा लढा झाला. ज्यात आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार यांना दिली. फक्त पक्षच दिला नाही तर बहुमताच्या जोरावर पक्षाचे चिन्हही दिले. ज्यामुळे शरद पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज निर्णय येण्याची शक्यता?

सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) सुनावणी होणार असून ती दुपारी 12 वाजल्यानंतर होणार आहे. तर आज निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

शरद पवारांच्या पक्षाला घड्याळ मिळणार की, तुतारीच राहणार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. पण लोकसभा निवडणुकीत झाले उलटेच शरद पवारांच्या पक्षाला तुतारी या चिन्हावर जनतेने भरभरुन मतदान केले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत अपयश आले, याऊलट विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला अपयश आले. तर अजित पवारांच्या पक्षाने घड्याळ या चिन्हावर सर्वाधिक 41 जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला तुतारी या चिन्हावर फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+