ठरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर, अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार
NCP Ajit Pawar 38 candidates list released : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची जाहीर झाली आहे. यात बारामती मतदारसंघातून अजित पवार तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार आहेत.
आज पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अजित पवारांसह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. आज 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
दादा नाही म्हटले अन् बारामतीतूनच नाव केलं जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या 38 उमेदवारांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामतीमधून विधानसभा लढवणार हे फायनल झालं आहे. अजित पवार बारामतीततून निवडणूक लढवणार नाही असे आधी म्हटले होते पण नंतर त्यांनी आपले नाव याच मतदारसंघासाठी फायनल केले. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका-पुतण्या लढत होणार हे निश्चित झाले आहे.
असे आहेत 38 उमेदवार
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन- आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला












Click it and Unblock the Notifications