अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात; 'या' पक्षाकडून मिळणार तिकीट
NCB officer Sameer Wankhede contest assembly election : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरण देशभर गाजले होते. याच प्रकरणातील एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
देशातील एका हायप्रोफाईल अधिकाऱ्याची थेट राजकारणात एन्ट्री झाल्याने चर्चा वाढल्या आहेत. समीर वानखेडे नेमके कोणत्या मतदारसंघातून व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील, याची उत्सुकता पत्नी क्रांती रेडेकरने जास्त ताणली नाही. तिने पती समीर कोणत्या पक्षाकडून लढेल, हे थेट सांगून टाकले.

काय म्हणाली पत्नी क्रांती रेडेकर?
महाराष्ट्राच्या राजकारणात एका हायप्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यावेळीच त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत एका मीडिया हाऊसने समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडेकर हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तिनेही या प्रकरणाला दुजारा दिला. यावेळी बोलताना क्रांती म्हणाली की, ही बातमी खरी आहे. लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय होईल. दरम्यान, समीर वानखेडे यांचा शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राजकारणात येण्याचं कारण तरी काय?
समीर वानखेडे यांना पहिल्यापासून समाजकारणात रस आहे. गेल्या काही वर्षांपासून ते समाजकारणातही कार्यरत आहेत. त्यांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्सविरोधी मोहिम राबवत ते अंमली पदार्थांविरोधात समाजावला जागृत करण्याचं काम करत आहेत. मुंबईतील तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
राजकारणात येऊन हे काम आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने ते आता राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. समीर वानखेडे हे सध्या चेन्नईमध्ये एनसीबी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक होते. त्यानंतर त्यांचं चेन्नईमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं.












Click it and Unblock the Notifications