Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Navratri 2024 : कन्या पुजन कधी करावे? कन्या पुजन करण्याचे शुभ मुहुर्त वेळ महत्व आणि विधी जाणून घ्या

Navratri 2024 : नवरात्रीची सध्या धुम सुरु आहे. या काळात सर्वत्र देवदर्शन आणि उपवासा्ंना जास्त प्राधान्य दिले जाते. खास बाब म्हणजे या काळात कन्या पूजनालाही विशेष महत्त्व असते, यालाच कुमारी पूजा किंवा कंजक पूजा असेही म्हटले जाते. हा विधी कधी केला जातो याची माहीत आपण आज जाणून घेणार आहोत.

कधी केले जाते कन्या पुजा

भारतीय परंपरेत स्त्रीचे महत्व सर्वात जास्त आहे. पुरुषांनाही जन्म देणारी स्त्रीच असते. त्यामुळे महिलांना शक्तीचे रुप मानले जाते. त्या दुर्गा, शक्ती असेही तिचे संबोधनच म्हणा..लहान मुलींना माँ दुर्गेचे रूप मानले जात असल्याने, नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हा एक आवश्यक विधी आहे. सामान्यतः दुर्गा अष्टमी आणि महानवमीला कन्या पुजन केले जाते.

Navratri 2024 Kanya pujan kadhi karave

नवरात्रीत कन्यापुजनाला महत्व

कन्यापूजेशिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्थितीत जाणून घ्या, शारदीय नवरात्रीची कन्या पूजा कोणत्या तिथीला करायची आहे. शारदीय नवरात्रीत संपूर्ण भारतातील लोक पूजा करतात. उपवास करून मातेची पूजा केली जाते. कन्येची पूजा केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना सफल होत नाही, असे मानले जाते. सहाव्या नवरात्रीनंतर लोक मुलींची पूजा करू लागतात. नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्या पूजेमध्ये मुलींचे वय 2 ते 10 वर्षांच्या दरम्यान असावे, कन्या पूजन अत्यंत शुभ मानले जाते.

कन्या पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • कन्या पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी.
  • कन्या पूजेच्या वेळी मुलींना फुले देणे शुभ मानले जाते.
  • मुलींना गुलाब, चंपा, मोगरा, झेंडू, जास्वंद इत्यादी फुले देऊ शकतात.
  • मुलींना फळ देऊन त्यांची पूजा करावी. फळ आंबट नसावे.
  • कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर किंवा हलवा वगैरे खायला द्यावे
  • मुलींना कपडे भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही भेट देऊ शकतात.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+