Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! जाणून घ्या उड्डाणे कधी सुरू होणार?

Navi Mumbai international airport News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMITA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केलेला हा भारतातील सर्वात मोठा 'ग्रीनफील्ड' विमानतळ प्रकल्प आहे.

मुंबईची गर्दी कमी करणार 'NMITA'

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. हे विमानतळ सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) सोबत सहकार्याने काम करेल, ज्यामुळे मुंबईतील वाढती गर्दी कमी होण्यास मदत होईल.

navi mumbai international airport

जागतिक ओळख

या प्रकल्पामुळे मुंबईचा समावेश आता ग्लोबल मल्टी-एअरपोर्ट सिस्टम (GMS) मध्ये होणार आहे, ज्यामुळे मुंबईची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.

उड्डाणे आणि तिकीट विक्रीची माहिती

विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी, व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

  • उड्डाणे सुरू होण्याची वेळ डिसेंबर २०२५
  • तिकीट विक्रीची सुरुवात ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस
  • संचालन करणाऱ्या एअरलाईन्स इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस

नवी मुंबई विमानतळाची अत्याधुनिक वैशिष्ट्ये काय?

नवी मुंबई विमानतळ हे भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल विमानतळांपैकी एक असेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी येथे अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

कोणत्या ेसवा मिळणार!

वाहन पार्किंग स्लॉटचे प्री-बुकिंग, ऑनलाइन बॅगेज ड्रॉप बुकिंग आणि डिजिटल इमिग्रेशन सेवा उपलब्ध असतील.

बॅगेज ट्रॅकिंग

विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) चे सीईओ अरुण बन्सल यांच्या मते, प्रवाशांना त्यांच्या फोनवर कॅरोसेलवर बॅगची नेमकी स्थिती कळवणारा संदेश मिळेल.

विमानतळावरील प्रमुख सुविधा आणि कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहे.

पायाभूत सुविधा

यामध्ये ३,७०० मीटर लांबीचा धावपट्टी (Runway), आधुनिक प्रवासी टर्मिनल आणि मोठ्या व्यावसायिक विमानांना हाताळण्यासाठी प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली (ATC) यांचा समावेश आहे.

या ठिकाणांपासून सर्वाधिक जवळ

हे विमानतळ अनेक महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांपासून जवळच्या अंतरावर आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT): १४ किमी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) तळोजा औद्योगिक क्षेत्र: २२ किमी,

मुंबई पोर्ट ट्रस्ट (मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे): ३५ किमी, ठाणे: ३२ किमी, भिवंडी (पॉवरलूम शहर): ४० किमी, एकंदरीत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ कनेक्टिव्हिटी वाढवणार नाही, तर या प्रदेशाच्या आर्थिक विकासालाही मोठे बळ देईल, अशी अपेक्षा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+