Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खा. सुप्रिया सुळे यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण, खा. भास्कर भगरे यांनी बांधली राखी

Raksha Bandhan 2024 : संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. लाडक्या बहीणी आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधत आहेत. राज्याच्या राजकारणातील असे अनेक भाऊ-बहीण आहेत.जे रक्षाबंधनाला आपल्या आपल्या लाडक्या बहीणीकडून राखी बांधून घेतात. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली.लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.

खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे ह्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली. याप्रसंगी भगरे कुटुंबिय उपस्थित होते. सर्वांना भेटून आनंद झाल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. औक्षण करतानाचा आणि राखी बांधतानाचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

supriya sule

पवार कुटुंबात प्रत्येक सण एकत्र येत साजरा केला जातो. दरवर्षी रक्षाबंधनाला खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांना राखी बांधतात. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीत उमेदवार होत्या. त्यामुळे या दोन्ही बहीण-भावांमध्ये राजकीय वितुष्ट आलं आहे. असं असलं तरीही हे बहीण-भाऊ एकत्र रक्षाबंधन साजरे करणार का? अशी अनेकांना उत्सुकता आहे.

दरम्यान दोन दिवसापुर्वी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे."मी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या बहिणी मला भेटतील त्यांच्यासोबत मी रक्षाबंधन साजरी करेन. सुप्रिया सुळे या देखील तिथे असतील तर मी त्यांना जावून भेटेन", अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.दरम्यान सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का? आपल्या भावाला त्या राखी बांधणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+