काळजाला चटका लावणारं रक्षाबंधन, बिबट्याच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू;धाय मोकलून बहिणीने बांधली राखी

नाशिकजवळील वडनेर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. पिंपळगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात (Nashik Leopard Attack) अवघ्या साडेतीन वर्षांच्या आयुष किरण भगत या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या आदल्या दिवशीच ही हृदयद्रावक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

nashik leopard attack rakhi for martyred brother

वडनेर रेंजरोड परिसरातील ही घटना रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली. आयुष आपल्या घराच्या बाहेर शेतात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढून नेले. जेवणासाठी वडिलांनी हाक मारली, पण आयुषने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी शोध सुरू केला. त्यावेळी टोमॅटोच्या शेतात रक्ताचे डाग दिसल्यावर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

रक्ताने माखलेला मृतदेह सापडला

या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, उपनगर पोलीस आणि ग्रामस्थांनी तात्काळ आयुषचा शोध सुरू केला. श्वानपथकाच्या मदतीने रात्री ११:४५ च्या सुमारास उसाच्या शेतात आयुषचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.

१० वर्षांच्या बहिणीने बांधली अखेरची राखी

आयुषच्या निधनामुळे भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुषच्या मागे त्याचे आई-वडील आणि १० वर्षांची मोठी बहीण श्रेया आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच ही घटना घडल्यामुळे कुटुंबावर दुःखाचे वातावरण पसरले आहे. रक्षाबंधनाच्या तयारीच्या उत्साहात असलेल्या श्रेयाने आपल्या लाडक्या भावाला अखेरची राखी बांधली. या हृदयद्रावक क्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. ज्या भावासाठी तिने मोठ्या प्रेमाने राखी घेतली होती, तोच भाऊ आता या जगात नाही, हे दु:ख त्या चिमुकलीला सहन होत नव्हते.

गेल्या सात महिन्यांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याआधीही एका मुलावर हल्ला झाला होता, पण तो बचावला होता. तीन दिवसांपूर्वीच एका महिलेवरही हल्ला झाला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+