नाशिक कुंभमेळा कधी, तारखा जाहीर; ध्वजारोहन, पहिले स्नान ते कधी होईल समारोप, जाणून घ्या सर्व काही
Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज 1 जून 2025 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकचा कुंभमेळा कधी सुरू होणार आणि शाहीस्नान कधी असणार तसेच कधी कुंभमेळ्याचा समारोप होणार, याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बैठकीत नेमकं काय ठरलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात साधू महंत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन साधू व महंतांची देखील उपस्थिती होती.

31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याला होईल सुरूवात?
या बैठकीत शाही स्नानाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा (Kumbh Mela) पर्वाला प्रारंभ होईल. 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्वस्नान असणार आहे.
कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा जाणून घ्या?
- प्रारंभ - 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळाचे रामकुंडावर ध्वजारोहण होईल. तेव्हापासून कुंभमेळा पर्वाला सुरवात होणार आहे.
- समारोप - 24 जुलै 2028 पर्यत कुंभमेळा सुरू राहील. याकालावधीत एकूण 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत. आखाड्याचे साधू महंत स्नान करतील, असे शाही स्नान असणार आहेत.
आखाडा ध्वजारोहन कधी असणार?
- 24/7/2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे.
- 29/7/2027 एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होणार आहे.
शाहीस्नानाच्या तारखा कधी असणार?
- 2 ऑगस्ट 2027 : सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे. \
- 31 ऑगस्ट 2027 : श्रावण वद्य अमावस्या ला महाकुंभस्नान होणार आहे.
- 11 सप्टेंबर 2027 : भाद्रपद शुद्ध एकादशीच्या शाही स्नान म्हणजेच अमृत स्नान होणार आहे.
- मुख्य पर्वकाळ असणाऱ्या 31 ऑगस्ट2027 च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केलें जाणार आहे.
नाशिकचा कुंभमेळा यंदा त्रिखंडी कुंभमेळा?
यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो. कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरूचे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरू कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्या तारखा देखील खालीलप्रमाणे आहेत..!
- 31/10/2026 गुरू सिंह राशीत प्रवेश
- 24/1/2027वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश
- 25/6/2027 गुरू सिंह राशीत प्रवेश
- 26/11/2027 गुरू कन्या राशीत प्रवेश
- 28/2/28 गुरू सिंह राशीत प्रवेश
- 24/7/2028 गुरू कन्या राशीत प्रवेश करत आहे.












Click it and Unblock the Notifications