Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वडिलांसोबत गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खून, कोयत्याने वार करत भररस्त्यात संपवलं...

नाशिक शहरात एका किरकोळ वादातून तरुणाचा जीव गेला आहे. पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळ बुधवारी सायंकाळी भाजी खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

Nashik crime news


पैशाच्या वादातून निर्माण झालेल्या संघर्षात अल्पवयीन आरोपीकडून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

किरकोळ वाद, पण गंभीर परिणाम

मृत युवकाची ओळख नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी (वय १९, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) अशी झाली आहे. तो आपल्या वडिलांसोबत आठवड्याच्या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेला असताना, पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीसोबत पैशांच्या कारणावरून वाद झाला. वाद इतका वाढला की, त्या व्यक्तीने अचानक धारदार हत्यार काढून नंदलालवर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

उपचारादरम्यान मृत्यू

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नंदलालला नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

उत्तमनगरमध्ये कोयत्याचा थरार; फर्निचर दुकानावर हल्ला

या घटनेच्या काही तासांनंतरच नाशिकमधील उत्तमनगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवाया उघडकीस आल्या. सायंकाळी ३ ते ४ गुंडांनी हातात कोयते घेऊन थेट फर्निचरच्या दुकानावर आणि एका घरावर हल्ला चढवला. या घटनेने परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.

जुन्या वादातून गुन्हा?

प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला घडला असल्याचा अंदाज आहे. गुंडांनी दुकानाची तोडफोड करत शेजारील घरावरही हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे, अशी माहिती अंबड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+