Crime News : पत्नीने पतीची हत्या करून बॉडीचे केले तुकडे, 'या' जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला!
Nashik Crime News : इंदूरच्या राजा रघुवंशीच्या हत्येची घटना गेल्या काही दिवसांपासून सद्या चर्चेत आहे. त्याच्या पत्नीनेच त्याचे कांड घडवून आण्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रात देखील पतीच्या हत्येचा उलघडा झाला आहे. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात घडली. पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून घरातील शोषखड्ड्यात टाकून पळ काढला. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर परिसरात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी कुठे व कशी घडली घटना?
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा गावात राहणाऱ्या एका महिनेले आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने तिच्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले व ते एका गोणीमध्ये भरून घरातील शोषखड्ड्यात तो मृतदेह टाकून तो खड्डा भरून टाकला. यशवंत मोहन ठाकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कसा झाला खूनाचा उलघडा?
मृत यशवंत यांच्या आईला वाटले की, आपला मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरी कामासाठी गेला आहे. त्याचा फोन देखील आला नाही किंवा तो देखील अजून का आला नाही, म्हणून यशवंतच्या आई व वडिलांनी सुनेकडे विचारणा केली. मात्र, तिने सासू व सासऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. दरम्यान, काही दिवसाने सून स्वतः गुजरातच्या बिलीमोरा येथे निघून गेली. त्यामुळे घरच्यांना अधिक संशय बळावला. यशवंत परत न आल्याने त्यांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर, यशवंतच्या भावाची पत्नी यशवंतची पत्नी प्रभाला गुजरातमध्ये भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिला काहीतरी संशयास्पद वाटले. तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यानंतर तपास सुरू झाला.
पोलिसांनी चौकशी केली असता मृतदेह गोणीत सापडला?
यशवंतच्या भावाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा घराच्या शोषखड्ड्यात यशवंतचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गोणीतील तुकडे असलेला मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु, या घटनेमुळे सुरगाणा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस आता यशवंतची पत्नीला ताब्यात घेण्यासाठी गुजरातला गेले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. पत्नीनेच नवऱ्याचा खून केल्याचा आरोप मृत यशवंतच्या आई-वडिलांसह भावाने केला.












Click it and Unblock the Notifications