घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती अन् आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, जहर पिऊन...
Nashik crime, husband and wife commit suicide by taking poison : अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्नसोहळा असल्याने घरात तयारी सुरू होती. सनईचौघडा वाजणार होता. नातेवाईकांना आप्तस्वकियांना निरोप दिला जात होता. परंतु, अशातच त्याच घरातून दोघांचा मृतदेह उचलण्याची वेळ आल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ही धक्कादायक व मन हेलावून लावणारी घटना नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात घडली. तर या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शाह दाम्पत्याने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नाशिक शहरातील टिळकवाडी येथील राहणारे जयेश शहा व रक्षा शहा या दाम्पत्याने रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवत असताना जेवणातून विष सेवन करून आपले जीवन संपवले.

रात्री मुलांसोबत जेवण केले अन् मग घडली...
दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर जय शहा यांनी आपल्या पत्नीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळच्या सुमारास शहा दांपत्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सरकार वाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबात सुरू होती लग्नाची लगबग
जय शहा व रक्षा शहा यांच्या मुलाचा विवाह अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला होता. 26 जानेवारी रोजी जयेश शहा यांच्या मुलाचा विवाह ठरला आणि संपूर्ण परिवारात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र दोघा मुलांसोबत राहणारे जयेश शहा यांनी रविवारी रात्री मुलांसोबत जेवणानंतर व्यावसायिक पतीने आपल्या पत्नीसह विष सेवन करून आत्महत्या केल्याने संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट..सुसाईट नोटमध्ये
या घटनेने संपूर्ण शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच शहा हे जैन समाजातील अतिशय नामवंत असल्याने संपूर्ण जैन समाजात देखील शहा यांच्या या घटनेला हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी घडलेल्या घटनास्थळी जाऊन तपास केला असता कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. शहा पती-पत्नीने आपले जीवन का संपवले? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे, या संदर्भात नाशिक पोलीस तपास करत आहे.
पती-पत्नीच्या रुममध्ये काय आढळून आले
नाशिक पोलिसांनी शहा दांपत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळून आले. संशयास्पद कोणतीही वस्तू अथवा आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आलेली नाही. नाशिक पोलिसांनी चौकशी केली मात्र अद्याप आत्महत्येचा कारण पोलिसांना समजू शकले नाहीत. अवघ्या वीस दिवसांवर आपल्या मुलाचा विवाह असताना या शहादांपत्याने नेमकी आत्महत्या का केली या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.
व्यावसायिक असलेले जयेश शहा यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावर कुटुंबीय देखील संभ्रमात आहे. व्यवसायात देखील काही अडचण होती का या संदर्भात आता पोलीस तपास करत आहे. मात्र प्रतिष्ठित आणि व्यावसायिक असलेले जयेश शहा आणि रक्षा शहा यांच्या आत्महत्येने पोलीस तपासात नेमकं काय समोरीत हे बघ ना आता महत्त्वाचं असणार आहे.












Click it and Unblock the Notifications