Nashik Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात, घाटात 8 वाहनांची धडक एक महिला ठार 22 जण गंभीर जखमी
Nashik Accident News : नाशिक-चांदवडच्या राहुड घाटात एक भीषण अपघात झाला आहे. या घाटात 7 ते 8 वाहनांची विचित्ररित्या धडक बसली. या अपघातात एक महिला ठार तर सुमारे 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे या जखमींवर उपचार सुरू आहेत. घाट उत्तरत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
चांदवडच्या घाटात झालेल्या अपघाततील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली तर स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काही वेळात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
Nashik Accident News : असा झाला अपघात
घाट उतरताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्याने पुढे असलेल्या वाहनाला ठोकले, तो जोरात पुढे गेला आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली. विशेष बाब म्हणजे, आज दोन वेळा अशा प्रकारचा अपघात झाला आहे. यापूर्वी संध्याकाळी तीन वाहनांचा घाटात अपघात झाला होता. त्यानंतर हा पुन्हा मोठा अपघात आहे. यात अजून किती जण दगावले याचा आकडा समोर येत नाही, अशी माहिती आमचे प्रतिनिधी यांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications