टोपी, पायजमा-शर्ट घालणारा एकमेव मंत्री नरहरी झिरवाळ, वाचा झिरवळांची राजकीय स्टोरी
Narhari Zirwal biography : डोक्यावर कांजीची वाकडी टोपी, पांढरा शुभ्र तीन गुंड्यांचा शर्ट आणि पायात पायजमा किंवा कधीकधी थेट धोतर.. या पेहरावाचा एकमेव मंत्री असेल, नरहरी झिरवाळ. आदीवासींचे नेतृत्व करणारे नरहरी झिरवाळ हे कायम संघर्ष करणारं व्यक्तीमत्व आहे. मितभाषी आणि साधा परंतु आभ्यासू नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा अध्यक्ष म्हणून आलेल्या जबाबदारीनंतर नरहरी झिरवाळ कायम चर्चेत राहिले. आता याच झिरवाळांना अजित पवारांनी पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली.
कोण आहेत नरहरी झिरवाळ?
दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावचे नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील असल्याने त्यांना वंचितांचे प्रश्न चांगले समजतात. झिरवाळ यांच्या राजकारणाची सुरुवात जनता दलातून झाली. जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अगदी पहिल्यांदा ते वनारे गावचे सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2001 साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते होते. मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात जात राजकारण सुरु ठेवले.
कला शाखेची आहे पदवी
झिरवळ यांची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावं लागलं होतं. या खडतर परिस्थितीतून नरहरी झिरवळ यांनी कला शाखेपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून ते कामाला लागले. परंतु, कामात मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी गावात शेतीची कामं सुरू केली. परंतु माजी खासदार हरिभाऊ महाले यांचा प्रभाव पडल्यानंतर ते राजकारणात आले. मात्र राजकारणात आल्यावरही झिरवळ यांची राहणी अत्यंत साधीच राहिली आहे. आजही ते साध्या घरातच राहतात. विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी ते शेतीची कामे करत होते.
सलग चौथ्यांदा आमदार
विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत झिरवळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. पुढे 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. आता हेच झिरवाळ चौथ्यांदा आमदार झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications