मोठी बातमी, कार चालकाला हदयविकाराचा झटका आल्याने मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
नंदुरबार : कार चालवताना चालकाला हदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील मिराज सिनेमा ते कोकणी हिल परिसरात एका 60 वर्षीय सायकल स्वाराला उडवलं असून सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पायी जाणाऱ्या आणखी 2 जणांना चिरडले असून त्यात एक 12 वर्षाचा मुलगा आणि त्याचा आईचा समावेश आहे.
या दोघांनाही उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्या दोघांचीही प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा वाहनावरील ताब्यात सुटल्याने हा अपघात घडला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कोकणी हिल परिसरातून आपल्या सायकलवर जात असलेल्या रज्जाक खान या 60 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला असून वाहन चालकचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे वाहनाचा धडकेत मनीषा पवार आणि बारा वर्षीय गोलू पवार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे












Click it and Unblock the Notifications