Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान

Nandkishor Kagaliwal honorary doctorate : भारतीय कृषी उद्योगातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रख्यात उद्योगपती आणि कृषी क्षेत्राचे गाढे अभ्यासक नंदकिशोर कागलीवाल यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. भारतीय शेती आणि बियाणे उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत, राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाने त्यांना 'विज्ञानातील मानद डॉक्टरेट' (Honoris Causa) प्रदान करून गौरविले आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजी जयपूर येथे हा सोहळा संपन्न झाला.

Nandkishor Kagaliwal honorary doctorate

भारतीय बियाणे उद्योगाच्या विकासामध्ये केलेले त्यांचे अग्रगण्य कार्य, तंत्रज्ञान-संलग्न उच्च उत्पादकता व कीड-प्रतिरोधक बियाण्यांचा प्रसार तसेच ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा गौरव या सन्मानाद्वारे करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे देशभरातील असंख्य शेतकरी व समाजघटकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

मागील वर्षी, कागलीवाल यांना सेज विद्यापीठ, भोपाळ यांच्याकडून मानद डॉक्टरेट (डी.लिट.) प्रदान करण्यात आली होती. समावेशक विकासावर ठाम विश्वास असलेले कागलीवाल भारताची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा, कला व वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+