नांदेडमध्ये मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात नांदेडच्या आलेगावच्या परिसरात सकाळच्या सुमारास घडला आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गूंज गावातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टरने प्रवास करत होत्या. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्ट्रर थेट विहिरीचा कोसळला आहे.. या विहिरीत पाणी असल्याने महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केलं. या या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत कार्य सुरु आहे. विहीरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रॅक्ट्रर पाण्यात पूर्णपण बुडला असून फक्त ट्रॅक्ट्ररचे एक चाक दिसत आहे. या ट्रॅक्टरमध्ये किती लोक होते याबाबत अजून माहिती मिळालेली नाही..
सविस्तर बातमी अपडेट होत आहे.












Click it and Unblock the Notifications