Vande Bharat Train: आजपासून नांदेड-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरु! लवकर गाठा मुंबई, वेळापत्रक जाणून घ्या
Nanded Mumbai Vande Bharat train inaugurated : मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून सुरू होणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.

नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ' वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
🚄CM Devendra Fadnavis Flagged off (Online) the extended Hazur Sahib Nanded – Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Vande Bharat Express.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2025
MoS Meghna Bordikar and other dignitaries were present.
🚄मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज… pic.twitter.com/2Ejz8GzUUe
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे फायदे
जलद प्रवास: नांदेड ते मुंबई (CSMT) हा सुमारे ६१० किलोमीटरचा प्रवास ही गाडी केवळ ९ तास ३० मिनिटांत पूर्ण करेल. यामुळे इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल.
प्रवासी क्षमता वाढली: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या गाडीचे डबे ८ वरून २० करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ५३० ऐवजी १४४० प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतील.
सुखकर आणि आरामदायी प्रवास: ही गाडी पूर्णपणे वातानुकूलित (AC) असून, दिवसा प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत सोयीची आणि आरामदायी आहे. यामुळे प्रवाशांना उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव मिळेल.
सहा दिवसांची सेवा: हुजूर साहिब नांदेडहून बुधवार आणि मुंबई CSMT हून गुरुवार वगळता ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असल्याने, येथे येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे तसेट वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
व्यावसायिक आणि पर्यटकांना फायदा: वारंवार प्रवास करणारे व्यावसायिक, कर्मचारी आणि पर्यटनस्थळांना भेट देणारे प्रवासी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन सेवेमुळे मराठवाड्यातील जनतेला सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल असे म्हटले आहे. हा निर्णय मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने या रेल्वेचे वेळापत्रक जारी केले आहे, ते खाली देत आहोत.
🚄CM Devendra Fadnavis Flagged off (Online) the extended Hazur Sahib Nanded – Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Vande Bharat Express.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2025
MoS Meghna Bordikar and other dignitaries were present.
🚄मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज… pic.twitter.com/2Ejz8GzUUe
1. नांदेड - मुंबई सीएसएमटी - एच.एस. नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवा

2. उद्घाटनाच्या विशेष वेळा गाडी क्रमांक ०२७०५ हुजूर साहिब नांदेड - मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस २६.०८.२०२५ रोजी खाली तपशीलवार आहे.

स्थानक वेळापत्रक (येण्याची-जाण्याची वेळ)
हुजूर साहिब नांदेड 11.20 प्रस्थान
परभणी 12.18 ते 12.20
जालना 13.58 ते 14.00
औरंगाबाद 14.48 ते14.50
मनमाड 17.33 ते 17.35
नाशिक रोड 18.33 ते 18.35
कल्याण 20.43 ते 20.45
ठाणे 21.03 ते 21.05
दादर 21.25 ते 21.27
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई 21.55 पोहचेल.
नांदेड - मुंबई सीएसएमटी - एच.एस. नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवा
गाडी क्रमांक 20705 नांदेड - मुंबई सीएसएमटी (बुधवार) स्थानके गाडी क्रमांक 20706
मुंबई सीएसएमटी - एच.एस. नांदेड (गुरुवार वगळून)
05.00 प्रस्थान हुजूर साहिब नांदेड 22.50 आगमन
- 05.40 ते 05.42 परभणी 21.33 ते 21.35
- 07.20 ते 07.22 जालना 19.43 ते 19.45
- 08.13 ते 08.15 औरंगाबाद 18.48 ते 18.50
- 09.58 ते 10.03 मनमाड 17.18 ते 17.20
- 11.00 ते 11.02 नाशिक रोड 16.18 ते 16.20
- 13.20 ते 13.22 कल्याण 14.04 ते 14.06
- 13.40 ते 13.42 ठाणे 13.40 ते 13.42
- 14.08 ते 14.10 दादर 13.17 ते 13.19
14.25 वाजता पोहचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई 13.10 वाजता निघणार












Click it and Unblock the Notifications