अखेर ठरलं.. थेट दिल्लीतून पत्र; नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

Nanded Lok Sabha by-election : नांदेड लोकसभेसाठीची पोटनिवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी केली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक काढत रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. रवींद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

Nanded Lok Sabha by-election Ravindra Chavan

राहुल गांधींनी दिले होते संकेत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दौरा केला होता. त्या दैऱ्यात दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जाऊन राहुल गांधींनी सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनाच पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळाले होते. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या सहीने आज अधिकृत पत्र देत रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. मेघालय येथील विधानपरिषद निवडणुकीसाठी जिंगजँक मरक यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून या 2 उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली.

वसंतराव चव्हाणांचा वारसा चालणार

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. अशोक चव्हाण व भाजपच्या दिग्गजांचा पराभव करत त्यावेळी वसंत चव्हाण यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्टला अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला.

वसंत चव्हाण यांच्या अचानक जाण्याने वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवाने चालवावी, असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता.त्यानंतर, आज अधिकृतपणे दिल्लीतील काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणारी याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+