Nanded Flood : नांदेड जिल्ह्यात पूर! रेल्वेमार्गावर पाणी, 'या' रेल्वे रद्द, या गाड्यांचे मार्ग वळवले
Nanded Flood situation critical Water on railway tracks : नांदेड जिल्ह्याला यापुर्वी पुराचा मोठा फटका बसला, त्यानंतर अतिवृष्टी आणि सततचा पावसाचा जोर पाहता आज पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. 17 मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावं पाण्याने व्यापली असून बहुतां गावांचा संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गावर पाणी साचले आहे.

जनजीवन विस्कळीत, नदीनाल्याना पूर
- प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव, लोहा या चार तालुक्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
- धर्माबाद, बिलोली, देगलूर या गावातील नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे.
- मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नदी-नाल्यांना पूर, बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे.
- मुखेड शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
- लोहा तालुक्यातील उमरा गावामध्येही पाणी शिरले आहे. लेंडी प्रकल्प क्षेत्रातील बाधित असलेल्या हसनाळ, बोरगाव ही गावे पुन्हा पाण्यात बुडाली आहेत.
विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले
विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत तसेच उर्ध्व मानार धरणाचे 7 दरवाजे उघडले आहेत. नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावरून वाका या ठिकाणी पुराचे पाणी वाहत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल, रद्दीकरण व आंशिक रद्दीकरण करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहे.
मार्गबदल करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या
- 27 ऑगस्ट रोजी सुटलेली गाडी (17057) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी नांदेड-आर्मूर-करीमनगर- पेद्दपल्ली बायपास -काझीपेट-सिकंदराबाद मार्गे वळविण्यात आली.
- 28 ऑगस्ट रोजी सुटलेली (12766) अमरावती ते तिरुपती ही गाडी परभणी-परळी-विकराबाद-सिकंदराबाद -काचिगुडा मार्गे चालविण्यात आली.
- गाडी 28 ऑगस्ट रोजी सुटलेली गाडी (17642) नारखेर ते काचिगुडा एक्स्प्रेस परभणी-परळी-विकराबाद-सिकंदराबाद - काचिगुडा मार्गे वळविण्यात आली.
- गाडी 28 ऑगस्ट रोजी सुटणारी (17058) लिंगमपल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी सिकंदराबाद-काझीपेट-पेद्दपल्ली बायपास- करीमनगर -आर्मूर-नांदेड मार्गे चालविण्यात आली.
- गाडी 28 ऑगस्ट रोजी सुटणारी (17662 ) नगरसोल-काचीगुडा एक्स्प्रेस ही गाडी परभणी-परळी-विकाराबाद-सिकंदराबाद-काचीगुडा मार्गे चालविण्यात आली
- गाडी 26 ऑगस्ट रोजी सुटलेली (17606 ) भगत कि कोठी -काचीगुडा विशेष एक्स्प्रेस ही गाडी निझामाबाद-आर्मूर-करीमनगर-पेद्दापल्ली -काझीपेत -मौलाली मार्गे चालविण्यात आली
पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
- आज 28 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
- काचिगुडा-नगरसोल (07055),
- काचिगुडा-पूर्णा (77605)
उद्या 29 ऑगस्ट रोजी ही गाडी रद्द
नगरसोल -काचिगुडा (07056) ही गाडी उद्या 29 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून स्टेशनवरील सूचना फलक, ध्वनिव्यवस्था, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मिडिया, बल्क SMS आणि अन्य उपलब्ध साधनांद्वारे माहिती प्रसारित केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications